वनविभागाची कारवाई : पुणे- बंगळूर महामार्गावर अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांसह 15 लाखाचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निसराळे फाटा येथे अवैधरित्या खैर प्रजातीच्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रक वन विभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतला आहे. गुजरातमधून आणलेल्या खैर जातीच्या लाकडाची तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात एकावर गुन्हा दाखल करून 15 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वन विभागाच्या भरारी पथकाला गुजरातमधून खैर प्रजातीच्या सोलीव लाकडाची तस्करी करणारा ट्रक चिपळूणच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरूनच शुक्रवारी रात्री पुणे- बेंगलोर महामार्गावर निसराळे फाटा येथे अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने निसराळे फाटा येथे आलेला ट्रक (क्र. एम. एच. 04 ई. वाय. 4434) अडवून तपासणी केली. त्यामध्ये कात तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा खैर प्रजातीचा सोलीव लाकूड माल मिळून आला. अधिक चौकशीअंती या लाकडाची अवैध वाहतूक केली जात असल्याचे आढळून आली.

कारवाईत भरारी पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण, वनपाल दीपक गायकवाड, विजय भोसले, वनरक्षक आनंद जगताप, राजेश वीरकर, सुहास पवार, दिनेश नेहरकर, वनपाल कुशल पावरा, राजू मोसलगी यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment