वनविभागाची कारवाई : जिवंत घोरपडीसह एकजण ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

खटाव तालुक्यातील नांदोशी येथे जिवंत घोरपड पकडून घरी आणल्या प्रकरणी वन विभागाकडून एकावर कारवाई करण्यात आली आहे. जिवंत घोरपड, दुचाकीसह एकास ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. धनाजी मारूती खताळ (वय 45, रा.नांदोशी, ता. खटाव, जि.सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदोशी गावचे हद्दीत घाटमाथा परिसर गायरान क्षेत्रातील घळी नावाच्या शिवारात धनाजी मारूती खताळ हा त्याअच्युता दुचाकी (क्र. MH 11 VU 8694) वरून जिवंत घोरपड अवैधरित्या पकडून घरी घेऊन जात होता. याबाबतची माहिती वनविभागास मिळाली असता. वनविभागाच्या पथकाने तत्काळ आरोपीसह दुचाकी आणि जिवंत घोरपडीस ताब्यात घेतले. तसेच वन्यप्राणी घोरपड ही वन्यजीव अधिनियम 1972 मधील अनुसूची 1 भाग – ll मधील संरक्षित प्राणी असल्याने वनविभागाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1072 चे कलम 9, 39, 43, 44, 48 अ, 50, 51 अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस चौकशी कामी अटक केली आहे.

त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या जिवंत घोरपडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सदरची कारवाई ही वनपरिक्षेत्र अधिकारी शितल फुंदे, वडुजचे वनपाल रामदास घावटे, बी. एस. जाविर, अकबर भालदार व आबा जगताप, हंगामी वनमजूर यांनी केली. तसेच पुढील तपास सातारचे उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment