RBI ने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या ‘हे’ जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची बैठक गेले तीन दिवस सुरु होती. 8 जून रोजी म्हणजेच आज या समितीने एकमताने रेपो दरात 50 बेसिस पॉंईटसनी वाढ केली. हे लक्षात घ्या कि, रेपो रेटद्वारे केंद्रीय बँकेकडून कडून इतर बँकांना अल्प कालावधीसाठी कर्ज दिले जाते. आता हा दर 4.90 टक्के इतका करण्यात आला आहे.

RBI Monetary Policy: No change in rates, announces Governor Shaktikanta Das

बुधवारी सकाळी 10 वाजता एक पत्रकार परिषद घेऊन RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो रेट मधील या बदलाची माहिती दिली. चला तर मग आपल्या या भाषणात त्यांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत हे थोडक्यात जाणून घेउयात…

फिक्स्ड डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दरांमध्ये 50 बेसिस पॉइंट्स (0.50 टक्के) वाढ करण्यात आली आहे. SDF साठीचा दर आधी 4.15% होता, जो आता 4.65% झाला आहे तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर आता 5.15 टक्के आहे.RBI

Top 5 Banks Currently Promising Higher Returns On FDs - Goodreturns

कोरोना महामारीशी संबंधित उपाययोजना सामान्य करताना, केंद्रीय बँकेकडून बँकिंग सिस्टीममध्ये पुरेशी लिक्विडीटी सुनिश्चित केली जाईल.

सबस्क्रिप्शन सारखे ट्रान्सझॅक्शन सुलभ करण्यासाठी रिकरिंग ई-पेमेंट्सची मर्यादा 5,000 रुपयांवरून 15,000 रुपये करण्यात आली आहे.

RuPay क्रेडिट कार्ड आता UPI शी लिंक करण्यात आले आहे.

3 जून रोजी भारताचा परकीय चलन साठा $601.1 अब्ज होता. तसेच सरकारी सिक्युरिटीज मार्केटवर RBI अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे गरज पडेल तेव्हा आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही यावेळी सांगण्यात आले. RBI

गेल्या दशकात घरांच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन नागरी आणि ग्रामीण सहकारी बँकांनी दिलेल्या पर्सनल होम लोनची मर्यादा 100 टक्क्यांहून जास्तीचे वाढवण्यात आली आहे.

Is there a structural change in inflation? | Mint

आर्थिक वर्ष 2023 साठी GDP वाढीचा अंदाज 7.2 टक्के राखून ठेवला गेला आहे. एप्रिल-जूनसाठी GDP वाढीचा दर 16.2 टक्के राहण्याचा अंदाज केला गेला आहे. जुलै-सप्टेंबरसाठी GDP वाढीचा दर 6.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे तर ऑक्टोबर-डिसेंबरसाठी GDP वाढीचा दर 4.1 टक्के राहण्याचा अंदाज केला गेला आहे. तसेच जानेवारी-मार्च 2023 साठी GDP वाढीचा दर 4.0 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. RBI

त्याचबरोबर FY23 साठी कंझ्युमर प्राइस इन्फ्लेशनचा अंदाज (CPI Inflation) 5.7 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्यात आला आहे. RBI ने सामान्य मान्सून आणि कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे महागाईचा दर प्रति बॅरल $105 वर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

RBI MPC | Monetary policy decision today: What to expect?

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/

हे पण वाचा :

RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ, आता EMI साठी द्यावे लागणार जास्त पैसे

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण !!! नवीन भाव तपासा

Google Pay वर आता वापरता येणार Hinglish भाषा, कसे ते जाणून घ्या

BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!

Multibagger Stock : ‘या’ मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला जोरदार नफा !!! 1 लाख रुपयांचे झाले 33 लाख रुपये

Leave a Comment