सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
सातारा तालुक्यातील कण्हेर जवळ असणाऱ्या जांभळेवाडी येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चौशिंगा या वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या दोघा जणांना वनविभागाच्या पोलिसांनी पकडले. नथु सखाराम करंजकर (रा. जांभळेवाडी) आणि राजकुमार मारुती इंदलकर (रा. कळंबे) अशी अटक केलेल्या दोघांची नवे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील कण्हेर जवळ असणाऱ्या जांभळेवाडी येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चौशिंगा या वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती वँव्हीभागाच्या अधिकाऱ्यांना मिळावी होती. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला. यावेळी कण्हेर धरणाच्या दक्षिण बाजूस वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना एका दुचाकीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर संबंधित आरोपींना विचारणा केली असता चौशिंगा प्राण्यांची शिकार केली असल्याची त्यांनी माहिती दिली.
याप्रकरणी नथु सखाराम करंजकर आणि राजकुमार मारुती इंदलकर या दोघांवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 व जैव विविधता कायदा 2002 अन्वये गुन्हा दाखलकेला आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून त्यासाठी किमान तीन ते कमाल सात वर्षापर्यंत शिक्षा आहे. या आरोपींना 7 नोव्हेंबर 2019 पर्यंत वनविभागाने वन कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवले यांनी दिली आहे.