रांची : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव आणि माजी आयपीएस अधिकारी अमिताभ चौधरी (amitabh chaudhary) यांचे आज निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना (amitabh chaudhary) अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना रांचीतल्या सेंटेव्हिटा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 62 वर्षांचे होते.
झारखंड क्रिकेटसाठी मोठं योगदान
2004 साली टीम इंडियात महेंद्रसिंग धोनी नावाचा एक युवा शिलेदार सामील झाला. त्यानंतर त्यानं भारतीय क्रिकेटमध्ये जे काही योगदान दिलं ते सर्वश्रुत आहे. पण झारखंडसारख्या छोट्याशा राज्याला क्रिकटच्या नकाशावर आणण्याचं काम केलं ते अमिताभ चौधरी (amitabh chaudhary) यांनी. अमिताभ चौधरी (amitabh chaudhary) हे झारखंड क्रिकेट असोसिएशनचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे रांचीसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्यात आले. 2002 साली चौधरी बीसीसीआयचे सदस्य बनले. तर 2005 साली झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. अमिताभ चौधरींनी (amitabh chaudhary) टीम इंडियाचे मॅनेजर म्हणूनही काम पाहिलं होते.
आयपीएस अधिकारी अमिताभ चौधरी
अमिताभ चौधरींचा (amitabh chaudhary) जन्म 6 जुलै 1960 रोजी झाला. 1984 साली आयआयटी खडगपूरमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. 1985 साली आयपीएस अधिकारी बनले.1997 साली ते रांचीचे एसएसपी बनले. 29 ऑक्टोबर 2020 साली त्यांची झारखंड लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते 5 जुलै 2022 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर