गुप्तेश्वर पांडे यांचा नितीश कुमारांच्या जेडीयुमध्ये प्रवेश; बिहार विधानसभा निवडणूक लढणार

पाटणा । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात प्रकाश झोतात आलेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये प्रवेश करणार आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी १ वाजता गुप्तेश्वर पांडे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत.

स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच गुप्तेश्वर पांडे यांचा राजकारणात प्रवेश होत आहे. बिहार निवडणूक लढवण्यासाठी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. पण गुप्तेश्वर पांडे यांनी सुरुवातीला आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं होतं. पण नंतर त्यांनी त्यात चूक काय असं म्हणत संकेत दिले होते.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर टीका करताना या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेनं त्यांच्या राजकीय वक्तव्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबदल बोलायची रिया चक्रवर्तीची लायकी काढल्यानेही ते वादात अडकले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like