माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 7 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर : पूर्ण यादी पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण साठी जिल्हा नियोजन मधून 7 कोटी 75 लाख रु. इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ते, पथदिवे, वस्त्यांचे विद्युतीकरण, शाळेच्या खोल्या बांधणे, ओढ्यावर साकव बांधणे, साठवण बंधारे, ग्राम तलाव दुरुस्त करणे, सोलर दिवे बसवणे, ग्रामपंचायत तसेच स्मशानभूमी यांना संरक्षण भिंत बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे, बंदिस्त गटर करणे, स्मशानभूमी सुधारणा करणे, खडीकरण व काँक्रिटीकरण इत्यादी विविध विकास कामे या निधीमधून होणार आहेत.

या निधीमधून विविध विभागामार्फत कामे केली जाणार आहेत. विद्युत विभाग –
येणपे येथे वाढीव वस्तीमध्ये पोल उभारणेसाठी रु. ८ लाख, धोंडेवाडी येथे नवीन डीपी उभारणेसाठी रु. ५ लाख, वहागाव येथील स्ट्रीट लाईटसाठी ४५ पोल उभारणेसाठी रु. १० लाख, वडगाव हवेली येथील एस टी स्टॅन्ड पाठीमागील वस्तीतील विद्युत तारा स्थलांतरित करणेसाठी रु. ३ लाख, सैदापूर येथे संगम कॉलोनी येथे अंडरग्राउंड केबल रु. ५ लाख, घोगाव येथील नायकवडी वस्ती येथे नवीन डीपी रु. २ लाख, कोयनावसाहत येथील शिवराज हौसिंग सोसायटी रस्ता व पथदिवे बसविण्यासाठी रु. ५ लाख, वारुंजी येथील पोल रस्त्यावरून स्थलांतर व वाढीव वस्तीपर्यंत नवीन विद्युत पुरवठा करणेसाठी रु. ५ लाख, पोतले येथे वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे रु. ४ लाख, सवादे येथील वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे रु. ४ लाख, उंडाळे येथील गट न ९६५ मधील ११ केव्ही लाईनचे ५ पोल शिफ्ट करणे रु. ३.५० लाख, ओंड येथे वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे रु. ५ लाख, नांदगाव येथे वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे रु. ५ लाख, खुबी येथील ११ केव्ही उच्च दाब वाहिनी स्थलांतरित करणे रु. २ लाख, धोंडेवाडी येथील बेघर वसाहत येथे नवीन रोहित्र उभारणे रु. ४ लाख, येणपे येथे वाढीव वस्ती विद्युतीकरणसाठी अतिरिक्त १०० केव्हीचे रोहित्र उभारणे रु. ७.५० लाख

डोंगरी विभाग :
कासारशिरंबे येथे शाळेच्या दोन खोल्या बांधणेसाठी रु. १७.९२ लाख, शेळकेवाडी येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे रु. ५ लाख, उंडाळे येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे रु. ५ लाख, पाटीलवाडी (म्हा.) रु. ५ लाख.
विशेष घटक साकव अंतर्गत निधी : तुळसण येथे मागासवर्गीयवस्तीतील साकव बांधणे रु. ३५.१७ लाख
ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या : काटेकरवाडी येथील १ खोली रु. ११.८२ लाख, काले येथील ३ खोल्या रु. ३५.४६ लाख, कोडोली येथील २ खोल्या २३.६४ लाख, खुबी येथील २ खोल्या २३.६४ लाख, नांदलापूर येथील २ खोल्या २३.६४ लाख, शिंगणवाडी येथील १ खोली ११.८२ लाख, शेणोली येथील १ खोली ११. ८२ लाख, साळशिरंबे येथील १ खोली ११.८२ लाख
ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या दुरूस्ती : विठोबाचीवाडी येथील खोली दुरुस्तीसाठी रु. 4 लाख, कापील येथे खोली दुरुस्तीसाठी रु. 4 लाख, गोंदी येथील खोली दुरुस्तीसाठी रु.२.५० लाख
साठवण बंधारे : घारेवाडी येथे साठवण बंधारा बांधणेसाठी रु. २४ लाख, शेवाळेवाडी (येवती) येथे साठवण बंधारा बांधणीसाठी रु. १७ लाख
जनसुविधा अंतर्गत: चौगुलेमळा येथे ग्रामपंचायत संरक्षणभिंत रु. ५ लाख, पवारवाडी (तारूख) येथे रस्ता सुधारणा रु. ५ लाख, बेलवडे बु. येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा रु. ५ लाख, महारुगडेवाडी येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा रु. ५ लाख, शेणोली येथील स्मशानभूमी अंतर्गत काँक्रिटीकरण व शेड रु. १० लाख, शेळकेवाडी (म्हा) येथील स्मशानभूमी रस्ता सुधारणा रु. ५ लाख, हणमंतवाडी (येवती) येथील ओढ्याकाठी संरक्षणभिंत रु. ५ लाख, कासारशिरंबे येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा रु. ५ लाख, घोणशी येथे स्मशानभूमीला संरक्षक भिंत रु. ५ लाख, खोडशी येथे दफनभूमी सुधारणा रु. ५ लाख, आणे येथे स्मशानभूमीसह कंपाउंड गेट रु. ५ लाख, पाचवड येथे स्मशानभूमीमध्ये पेव्हर ब्लॉक रु. ५ लाख, किरपे येथे स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण रु. ५ लाख, वहागाव येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे रु. १२ लाख

नागरीसुविधा अंतर्गत:
वडगाव हवेली येथे बंदिस्त गटर रु. १० लाख, गोळेश्वर येथे बंदिस्त गटर रु. ५ लाख, आटके येथे बंदिस्त गटर रु. ५ लाख, वारुंजी येथे रस्ता काँक्रिटीकरण रु. १० लाख, कार्वे येथे आर सी सी गटर सह रस्ता काँक्रिटीकरण रु. ५ लाख, शेरे येथे रस्ता काँक्रिटीकरण रु. १० लाख, विंग येथे रस्ता काँक्रिटीकरण आर सी सी गटर रु. ५ लाख, कार्वे येथे धानाई मंदिर परिसर सुधारणा रु. ५ लाख.
क वर्ग तिर्थक्षेत्र : घारेवाडी येथे धुळेश्वर देवस्थान परिसर रस्ता सुधारणा व पिण्याच्या टाकी व पाईपलाईन रु. ८ लाख, पाचवडेश्वर-नारायणवाडी येथे पाचवडेश्वर मंदिर लगत उत्तर बाजूस संरक्षक भिंत व मंदिर परिसर सुधारणा रु. ५ लाख, रेठरे खुर्द येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर सुधारणा रु. १५ लाख
सर्वसाधारण साकव : वानरवाडी येथे ओढ्यावर साकव रु. ३५.३७ लाख, सवादे येथे ओढ्यावर साकव रु. ३३ लाख
5054 योजने अंतर्गत: रा.मा. ४ ते वहागाव घोणशी कोपर्डे हवेली पार्ले बनवडी रस्ता इजिमा १२५ सुधारणा करणेसाठी (आरसीसी गटर सह) रु. ४० लाख, कपिल कोडोली इजिमा ११९ सुधारणा करणेसाठी (आरसीसी गटरसह) रु. ३० लाख, येवती घराळवाडी मस्करवाडी चव्हाणवाडी धामणी डाकेवाडी निवी रस्ता इजिमा १३० कराड हद्द सुधारणा करणेसाठी रु. २५ लाख
3054 योजने अंतर्गत:
बोत्रेवाडी, जिंती, शेवाळवाडी ग्रामा ३०३ सा क्र ०/०० ते २/०० सुधारणा करणे रु. ३० लाख, काले बेंदमळा, धोंडेवाडी रस्ता ग्रामा २८२ सा क्र ०/०० ते २/०० सुधारणा करणे रु. २५ लाख, प्रजिमा ५५ शिंगणवाडी, कोळे, पाटीलमळा, कराळवाडी ते आणे जोडरस्ता (भाग-आणे ते विकासनगर) सुधारणा करणे रु. ३० लाख, चचेगाव, येरवळे, पोतले, काळेपाणंद रस्ता ग्रामा १६२ (चचेगाव भाग) सुधारणा करणे रु. २० लाख. असा एकूण ७ कोटी ७५ लाख रुपये इतका भरघोस निधी कराड दक्षिण साठी जिल्हा नियोजन मधून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून या निधीमधून कराड दक्षिण मधील गावांमध्ये हा निधी मिळाला असून लवकरच हि सर्व कामे सुरु होतील.