Satara News : सांत्वन अन् सलोख्यासाठी सर्वात आधी धावले पृथ्वीराजबाबा; पुसेसावळीतील दोन्ही समाज बांधवांना केले ‘हे’ आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे दंगल व जाळपोळीची घटना घडली. त्यानंतर संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला. या घडलेल्या घटनेनंतर शांत झालेल्या पुसेसावळीस नुकतीच माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच ‘गावात शांतता राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. पुसेसावळी शांतताप्रिय गाव आहे. सर्वांनी मिळून मिसळून रहावे, असे आवाहन पृथ्वीराजबाबांनी केले.

पुसेसावळी येथे भेटीप्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच मंडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून पृथ्वीराजबाबांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष झाकीर पठाण, फारूक पटवेकर, पुसेसावळी गावचे सुरेशबापू पाटील, माजी सरपंच दत्तात्रय रुद्रके, सोसायटी चेअरमन रवी कदम, तंटा मुक्ती अध्यक्ष अरविंद लवळे, माजी सरपंच सुरेश पाटील, मंडल अधिकारी, पोलीस पाटील सुरज दळवी, उपसरपंच विजय कदम आदिसह दोन्ही समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हान यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गावातील ग्रामस्थांनी बाहेरील व्यक्तींच्या प्रभावात येऊन गावातील वातावरण बिघडवू देऊ नये तसेच सर्वांनी मिळून मिसळून रहावे. पुसेसावळी शांतताप्रिय गाव आहे, या गावाला क्रांतिवीरांचा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या गावातील स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त सांडले आहे. तसेच पुसेसावळीची बाजारपेठ जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठे पैकी एक आहे. त्यामुळे या गावात शांतता राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे.

दंगलीतील मृत्यू पावलेल्या शिकलगारच्या कुटुंबियाची घेतली भेट…

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीतील दंगलीत मृत झालेल्या नूरूल शिकलगार याच्या घरी भेट देऊन त्यांच्या आई वडील पत्नीची विचारपूस करून सांत्वन केले.

पोलिस अधिकाऱ्यांशी केली चर्चा

पुसेसावळी या ठिकाणी दोन्ही समाजातील ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या ठिकाणी घडलेल्या दंगली v जाळपोळीच्या घटनेबाबत माहिती घेत त्यांना सूचनाही केल्या.