औरंगाबाद – शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. यातच आता माजी नगरसेवकाच्या मुलाने दोन साथीदारांच्या मदतीने एका 58 वर्षाच्या वृद्धास उड्डाण पुलाच्या बाजूला नेऊन बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजता महाजन कॉलनी येथील एका पान टपरी जवळ घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विषयी अधिक माहिती अशी की, अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करणारे फिर्यादी अशोक कुलकर्णी यांना एका अनोळखी व्यक्तीने दगड मारला होता. या विषयी तक्रार देण्यासाठी ते पोलिस ठाण्याकडे जात असताना, मुकुंदवाडी बस स्टॉप जवळ पोहोचले त्यानंतर तिथे “काका आम्ही तुम्हाला तुमच्या घरी सोडतो” असे म्हणून अशोक कुलकर्णी यांना सागर लॉन्स उड्डाणपुलाच्या पलीकडे घेऊन गेले. त्याठिकाणी माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांचा मुलगा शिवराज शिंदे व त्याच्यासोबतच या दोन मित्रांनी कुलकर्णी यांना मारहाण केली. त्यांच्या पाठीवर हातावर दांडक्याने मारहाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मुळे हे करीत आहेत.

![marhan] marhan]](https://hellomaharashtra.in/wp-content/uploads/2021/09/ब्रेकिंग-बातम्यासाठी-आमच्या-वेबसाईटला-भेट-द्या-httpshellowmaharashtra.in-53.jpg)


