अजित आगरकरसोबत BCCIचा पक्षपात? पात्रतेपेक्षा अधिक अनुभव असूनही निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव डावललं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद । भारतीय क्रिकेट संघ निवड समितीच्या (BCCI Selection Committee chairman) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची निवड करण्यात आली. निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी मुंबईकर अजित आगरकरचं (Ajit Agarkar) नाव आघाडीवर होतं. मात्र जेव्हा चेतन शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तेव्हा सर्वांना एकच धक्का बसला.

अजित आगरकरकडे निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी पात्रतेपेक्षाही अधिक अनुभव होता. मात्र त्यानंतरही त्याला डावलून चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली. यामुळे क्रिकेट विश्वात आगरकरसोबत पक्षपातीपणा झाल्याचा आरोप केला जात आहे. आगरकरसह अबे कुरुविलाने वेस्ट झोनमधून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे अनुभवाच्या तुलनेत आगरकरची निवड होणं अपेक्षित होतं. मात्र तसं घडलं नाही. (BCCI internal politics)

अहमदाबादमध्ये बीसीसीआयची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत टीम इंडियाच्या नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली. यामध्ये वेस्ट-झोनसाठी आगरकरऐवजी अबे कुरुविलाच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या सर्व मागे काही तरी नक्कीच कट कारस्थान आहे. तसेच आगरकरला बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणाचा फटका बसला असल्याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात आणि चाहत्यांमध्ये सुरु आहे.

MCAची साथ नाही
माजी गोलंदाज अबे कुरुविलाला एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या काही अधिकाऱ्यांची साथ होती. त्यामुळे आगरकर ऐवजी कुरुविलाची निवड करण्यात आली, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली.

अनुभव असूनही निवड नाही
सर्वाधिक कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या उमेदवाराची निवड समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात येते. आगरकरच्या कारकिर्दीपुढे कुरुविला आसपासही नाही. आगरकरने टीम इंडियाकडून 221 सामने खेळले आहेत. यामध्ये 349 विकेट्स घेतल्या आहेत. तर कुरुविलाने केवळ एकूण 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 50 विकेट्स घेतल्या आहेत.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’