हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर भारतीय संघाचा सामना इंग्लंड विरुद्ध असून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सामने मायदेशात होणार आहेत. त्यामुळे इंग्लंड साठी ही मालिका जिंकणे नक्कीच सोप्प नसेल. इंग्लंडच्या या आगामी भारत दौऱ्याला येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहेत. या दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडच्या संघाची दोन दिवसापूर्वी घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे इंग्लंडने भारत दौऱ्यासाठी काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र इंग्लिश क्रिकेटपटू केविन पीटरसनने मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लंडचा संघ आपल्या सर्वोत्तम संघासह भारताविरुद्धच्या मालिकेत उतरला नाही, तर तो भारतीय संघाचा अपमान असेल अस केपी म्हणाला.
केव्हिन पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आपला सर्वोत्तम संघ निवडला आहे की नाही, यावर सध्या चर्चा सुरु आहे. भारतात मालिका जिंकणे हे ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याइतकेच महत्वाचे आहे. आपला संपूर्ण ताकदीचा संघ या मालिकेत न उतरवणे, हे बीसीसीआय तसेच इंग्लंडच्या चाहत्यांसाठी अनादराचे असेल. जॉनी बेअरिस्टो या मालिकेत खेळायलाच हवा. ब्रॉड आणि अँडरसनलाही खेळावेच लागेल.”
https://twitter.com/KP24/status/1353245716295147520?s=19
पीटरसन व्यतिरिक्त मायकेल वाॅन आणि नासीर हुसेन या माजी खेळाडूंनीदेखील या धोरणावर टीका केली आहे. विशेषतः जॉनी बेअरिस्टोला या मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय अनाकलनीय असल्याचे मत हुसेन यांनी मांडले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’