दिवाळीच्या तोंडावर महाविकास आघाडीला झटका : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस ईडीने अटक केली. सोमवारी सकाळी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र, तरीही त्यांचा काही उपयोग झाला नसल्याने अखेर दिवाळीच्या तोंडावर महाविकास आघाडीला झटका बसला आहे.

मुंबईत ईडीच्या कार्यालयात सकाळी अकरापासून देशमुख यांची चौकशी सुरू केली होती. रात्री आठनंतर ईडीचे दिल्लीतील अधिकारी सत्यव्रतसिंह हे मुंबईत दाखल झाल्यानंतर देशमुख यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

 

ईडीच्या अटकेच्या कारवाईपूर्वी देशमुख यांनी एक निवेदन प्रसिद्धिस दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य केले. मला पाठवलेल्या समन्सलाही मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो. मा. उच्च न्यायालयाने मला सांविधानिक हक्कांतर्गत विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहून पुढील चौकशीस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह बेपत्ता आहेत, त्यांच्यावरही अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. याचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले होते.

Leave a Comment