चेन्नई । भारताच्या आणखी एका माजी क्रिकेटपटूने राजकारणात प्रवेश केला आहे. माजी फिरकीटपटू आणि प्रसिद्ध कमेंटटेर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला. आज बुधवारी चेन्नईत भाजपमध्ये प्रवेश केला. तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूक होणार आहे असून त्याआधी त्याने भाजपचे कमळ हातात घेतले. यावेळी भाजपचे राज्याचे प्रभारी सीटी रवी आणि पक्षाचे अध्यक्ष एल मुरूगन उपस्थित होते.
कालच मंगळवारी सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याची घोषणा केली. यावर प्रतिक्रिया देताना सीटी हवी म्हणाले, रजनीकांत एक महान नेते आहेत. आम्ही त्यांचा सम्मान करतो. त्यांच्या ताकदीची आम्हाला कल्पना आहे. ते नेहमी देशाचे हित आणि तामिळनाडूच्या हितासाठी उभे राहिले आहेत.
भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी ९ कसोटीत आणि १६ वनडेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत त्यांनी ४४.०४च्या सरासरीने २६ तर वनडेत ३५.८७ च्या सरासरीने १५ विकेट घेतल्या आहेत. एप्रिल १९८३ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी पदार्पण केले. तर जानेवारी १९८६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी खेळली. वनडेत फेब्रुवारी १९८५ मध्ये शिवरामकृष्णन यांनी पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केले आणि ऑक्टोबर १९८७ साली झिम्बब्वे विरद्ध अखेरची वनडे खेळली. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते समालोचक म्हणून कार्यरत झाले होते. या क्षेत्रातही शिवरामकृष्णन यांचा नावलौकिक झाला.
Tamil Nadu: Former Indian cricketer Laxman Sivaramakrishnan joins Bharatiya Janata Party in Chennai. https://t.co/bE05u082hx pic.twitter.com/U5arZLrboQ
— ANI (@ANI) December 30, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’