जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपमधील नेत्यांकडून टीका केली जात आहे. सध्या पवार कुटुंबांवर विरोधकांकडून टीका केली जात असल्याने जामखेड येथील एका कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजप नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. “कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय. कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना, अशा शब्दात शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका आहे.

जामखेड येथील एका कार्यक्रमप्रसंगी माजी मंत्री तथा भाजप नेते राम शिंदे यांनी म्हंटले की, कर्जत जामखेड मतदार संघाची अवस्था हि खूप बिकट आहे. माझी तर जिरलीच, पण आता जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळी माणसं म्हणतात, आमचीही जिरली साहेब आता.

यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाल्याची आठवण यावेळी करून दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार बारामतीचे असूनही कर्जत जामखेडमधून लढले आणि कर्जत-जामखेडकरांच्या आशीर्वादाने आमदार झाले. बाहेरुन येऊनही रोहित पवारांनी हरवले, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here