केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वडूज : हॅलो महाराष्ट्र – खटाव येथील खटाव – माण ऍग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना वडूज पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना वडूज न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जगदीप थोरात यांच्या मृत्यू प्रकरणी वडूज पोलिसांनी एकूण वीस जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामधील ७ ते ८ आरोपींना वडूज पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. या दरम्यान माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीच्या कारणावरून जामीन अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले.

प्रकृतीच्या कारणावरून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना वैद्यकीय उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हॉस्पिटलमधून डीस्चार्ज भेटल्यानंतर वडूज पोलीसांनी त्यांना सातारा येथून ताब्यात घेतले. माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना पोलिसांनी वडूज येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख हे करत आहेत.

Leave a Comment