हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तब्बल २३४ दिवसांनंतर परमबीर सिंग काल मुंबईत दाखल झाले. त्यानंतर कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज ते ठाण्यात दाखल झाले आहेत. ठाण्यात परमबीर यांच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान ठाणे कोर्टाने त्यांचा वॉरंट रद्द केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना कोर्टाने अटक वॉरंट रद्द करताना दोन अटी घातल्या आहेत. जेव्हा तपास अधिकारी चौकशीला बोलावतील तेव्हा उपस्थित राहायचे आणि १५ हजाराचा वैयक्तिक जामिनावर भरावा लागणार आहे. परमबीर सिंह हे आज शुक्रवारी ठाण्यात दाखल झाले. त्यांच्यावर क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी खंडणीचे आरोप करत तक्रार केली होती. त्यामुळेच ठाणे नगर पोलिस ठाण्यात ते आज सकाळीच हजर झाले. याठिकाणी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी परमबीर सिंह यांची चौकशी केली. दरम्यानच्या काळात ते ठाण्यातील कोर्टातही हजर राहिले. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत.
२०१८ साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये वसूल केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात परमबीर सिंह यांना ठाणे नगर पोलिसांनी समन्स जारी केले होते. ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती.