मनमोहन सिंग यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दोन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांना अचानक ताप आला तसेच अस्वस्थही वाटू लागलं होतं. त्यामुळे तात्काळ दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नव्या औषधांची रिअक्शन झाल्याने मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली होती, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, खबदारी म्हणून डॉक्टरांनी मनमोहन सिंग यांची कोरोनाची टेस्ट सुद्धा घेतली. दरम्यान, त्यांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट असून त्यांचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मनमोहन सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असून एम्समध्ये कार्डिओथोरॅसिक विभागात डॉक्टरांच्या पथकाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम मनमोहन सिंग यांची देखभाल करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. २००९ मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर एम्समध्येच कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”