माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

pratibha patil devisingh shekhawat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांचे दुर्दैवी निधन झालं. आज (शुक्रवारी) सायंकाळी 6 वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

1972 मध्ये देवीसिंह शेखावत यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली. देवीसिंह शेखावत हे स्वत: राजकारणात सक्रिय होते. काँग्रेसमधून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. अमरावतीचे महापौर ते आमदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. 7 जुलै 1965 ला प्रतिभा पाटील आणि देवीसिंह शेखावत यांचा विवाह झाला होता.

विद्या भारती शैक्षणिक संस्था फाउंडेशनच्या महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले देवीसिंग शेखावत डॉ. शेखावत हे 1985 मध्‍ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून निवडून आले होते. ते 1991 मध्‍ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले. मात्र त्यांनतर 1995 च्‍या विधानसभेच्‍या निवडणुकीत त्‍यांना पराभव स्वीकारावा लागला होता.