हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी परराष्ट्र मंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. हेन्री किसिंजर यांनी बुधवारी कनेक्टिकट येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यासंबंधित माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. हेन्री किसिंजर यांनी आपल्या कार्यकाळात 2 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हाताखाली काम केले. तसेच, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर त्यांनी अमिट छाप सोडली.
खरे तर, 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी वादग्रस्त भूमिका घेतली होती. तसेच, हेन्री किसिंजर यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर नोबेल समितीच्या दोन सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 1970 च्या दशकात हेन्री किसिंजर यांनी रिपब्लिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी पार पाडली. या काळामध्ये त्यांनी अनेक परिवर्तनशील जागतिक घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका पाहिजे.
हेन्री किसिंजर यांनी अमेरिकेच्या दोन राष्ट्राध्यक्षांसोबत काम केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या अनेक बैठकींमध्ये सहभाग नोंदवला होता. यानंतर त्यांच्या या नेतृत्व शैलीवर एक पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, उत्तर कोरियाकडून निर्माण झालेल्या आण्विक धोक्यासंदर्भात त्यांनी सिनेट समिती समोर आपली साक्ष दिली होती. अशा अनेक कारणांमुळे हेन्री किसिंजर चर्चेत राहिले आहेत.