राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी प्रवक्ते, विचारवंत पत्रकार माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य (M. G. Vaidya) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. मा. गो. वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते.

ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. वैद्य यांचे आज दुपारी 3.30 वाजता निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते. यामुळे त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व मोठा आप्त परिवार आहे.

मा. गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’