माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांचे हार्ट अटॅकने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – माजी कसोटीपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज सदानंद मोहोळ (Sadananda Mohol) यांचे शनिवारी रात्री 11.30च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. माजी खासदार अशोक मोहोळ यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.

सदानंद मोहोळ (Sadananda Mohol) यांच्या माघारी पत्नी शीला आणि मुलगा कृणाल असा परिवार आहे. रविवारी दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदानंद मोहोळ (Sadananda Mohol) यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे समकालीन क्रिकेटपटू व माजी कसोटीपटू चंंदू बोर्डे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव रियाझ बागवान, माजी रणजीपटू अन्वर शेख, निकी सलढाना, सतीश पेडणेकर, मिलिंद गुंजाळ, अनिल वाल्हेकर, अनंत धामणे, विश्वास गोरे, सुधीर कुलकर्णी, अरविंद मेहंदळे, सुरेश ढुमके यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, माजी प्रदेश उपाध्यक्ष देवीदास भंसाळी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ व अंकुश काकडे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, बाळासाहेब गांजवे, थिएटर असोसिएशनचे अध्यक्ष कुदळे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!