अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना (ivana passed away) यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. इव्हाना ट्रम्प (ivana passed away) एक अद्भुत आणि सुंदर महिला होती जिने एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी जीवन जगले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इव्हाना (ivana passed away) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रम्प टॉवरसह अनेक इमारती बनवण्यात मदत केली होती.

इव्हाना ट्रम्प (ivana passed away) या एक मॉडेल होत्या. त्यांनी 1977 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत लग्न केले आणि 1992 मध्ये घटस्फोट घेतला. इव्हाना ट्रम्प यांनी 1980 च्या दशकात ट्रम्प यांची माध्यमांमध्ये प्रतिमा तयार करण्याची भूमिका बजावली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार न्यूयॉर्कच्या अपर ईस्ट येथे इवाना यांचं राहत्या घरी निधन झालं. इवाना (ivana passed away) डोनाल्ड ज्युनिअर, इवांका आणि एरिक ट्रम्प यांच्या आई होत्या.

डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन विवाह
डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना ट्रम्प (ivana passed away) 80 च्या दशकात न्यूयॉर्क शहरातील सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (ivana passed away) यांनी 1993 मध्ये अभिनेत्री मार्ला मॅपल्सशी लग्न केलं. पण मॅपल्स यांच्यासोबतचं ट्रम्प यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि 1999 मध्ये त्यांनी मारला मॅपल्स यांना घटस्फोट दिला, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2005 मध्ये मेलानिया ट्रम्प यांच्याशी लग्न केलं.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment