सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खटाव तालुक्यातील गिरिजाशंकरवाडी येथील शेतकरी नवनाथ संपत थोरवे यांच्या चार जनावरांवर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी औध पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील किरिजाशंकर वाडीत शेतकरी नवनाथ थोरवे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसोबत पशुपालन व्यवसाय करतात. त्यांच्याकडे एकुण ७ जनावरे असुन त्यामध्ये एक मोठी म्हैस असून बाकी एक रेडा व पाच पैलारु रेडी आहेत. नेहमीप्रमाणे ते सकाळी आपली गुरे डोंगरात चरण्याकरीता सोडत असतात व चरुन झाल्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत जनावरे चरून झाल्यानंतर परत घरी येत असतात. मात्र, शनिवारी जनावरे रात्री उशीर झाला तरी घरी आली नाहीत म्हणून नवनाथ यांनी त्यांचा शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाहीत. तर त्यांच्या घरी आलेल्या जनावरांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे आढळून आले.
https://twitter.com/santosh29590931/status/1637325557552807941?t=gH1CJtlUsu-e2IV_ijiaCw&s=19
दरम्यान, या प्रकरणी नवनाथ यांनी औंध पोलीस ठाण्यात संशयित हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधित हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करून आमच्या सह या मुक्या जनावरांना न्याय द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरीनवनाथ संपत थोरवे यांनी केली आहे.