औरंगाबाद | मागील महिन्यात शहरपोलीस दलात बदल्या करण्यात आल्या होत्या. 560 कर्मचाऱ्यांना नवीन पोलीसठाणे मिळाले होते. आता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार नवीन पोलीस ठाणे वाढवण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आणि शहराजवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीना जोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद शहरालगतच्या औद्योगिक क्षेत्र पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत समावेश करण्याबाबत हा प्रस्ताव असून शहर पोलीस आयुक्तालय हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे. महासंचालकांसमोर गृहमंत्री यांच्या बैठकीत विषय मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शहराचा विस्तार बघता या ठिकाणी दोन पोलीस आयुक्तालयाच्या पदाबद्दल पाठपुरावा सुरू आहे. चार नवीन पोलीस ठाणे औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या काळात शहरात पोलिस दलाची संख्याही वाढेल अशी माहिती अप्पर महासंचालक तथा शहर पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी पत्रकारांना दिली.
औरंगाबाद शहरात पोलीस उपायुक्त या पदावर रुजू झालो होतो. सध्या औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळत असून या पदावर काम करत असताना आता अप्पर पोलीस महासंचालक सेनेत पदोन्नती मिळाली आहे. शहराचा पोलिस विभागात दर्जा वाढला आहे. औरंगाबाद हे माझ्यासाठी लकी ठरले आहे. असे डॉ. निखिल गुप्ता म्हणाले.