कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रा मोठ्या उत्साहात सुरु झाली असून या यात्रेसाठी आज राज्यभरातून लाखो भाविक कावडसह दाखल झाले आहेत. यात्रा सुरु असताना मुंगीघाटातून काही भाविक कावडी घेऊन गड चढत होते. यावेळी गडावर येत असताना कवडीसोबत चौघेजण दरीत कोसळले असल्याची घटना आज दुपारी घडली. यावेळी जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यापासून पूर्वेकडे 90 किमी अंतरावर असणाऱ्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवयाची आज मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. यात्रेसाठी राज्यभरातील भाविक कावडसह दाखल झाले आहेत. या यात्रेत भाविक कावड घेऊन गडावर चढतात. गडावर पोहचल्यानंतर त्यातील पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो.
https://www.facebook.com/watch/?v=773945784328676&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR&ref=sharing
हि कावड हाताची मानवी साखळी करुन घाटातून वर चढवली जाते. दरम्यान आज दुपारनंतर घाटातून काही भाविक कावड घेऊन गड चढत होते. यावेळी निम्म्या गडावर जाताच त्याच्यातील चौघेजण कवडीसोबत खाली दरीत कोसळले. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी तात्काल रेस्क्यू ऑपरेशन राबवित जखमी चार जणांना दरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयाकडे हलवले.