औरंगाबाद | कार चालवताना नियंत्रण सुटल्याने समोरून जाणार्या भरधाव दुचाकीला धडक देऊन दगडावर जाऊन पलटी झाली. 28 जुलै रोजी फुलंब्री औरंगाबाद रस्त्यावरील गणोरी फाट्याजवळ ही घटना घडली. यावेळी चार जण जखमी झाले आहेत.
दुचाकीचालक प्रकाश जनार्दन शिंदे (22 रा. पळशी तालुका सिल्लोड) मनोज अर्जुनराव माळी (27) युवराज ईश्वर परदेसी (57) रघुनाथ चव्हाण (57 रा. जळगाव सर्व) अशी जखमींची नावे आहेत. औरंगाबादकडून फुलंब्रीकडे जाणारी कार चालकाचे कारचे नियंत्रण सुटल्याने समोर जाणाऱ्या दुचाकीला धडक देऊन दुचाकी पलटी झाली आहे.
यामध्ये दुचाकीस्वार व कार मधील पाच प्रवाशांपैकी तीन जण गंभीर झाले आहे. महात्मा फुले क्रीडा मंडळाचे रुग्णवाहिका चालक विजय देव माळी यांनी जखमींना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.