चार वर्षाच्या चिमुरडीने घरी आणली शिवरायांची मूर्ती; शिवजयंती निमित्ताने महाराजांना अनोखी मानवंदना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कळवा ,ठाणे मधील एका चार वर्षाच्या चिमुरडीने शिवजयंती निमित्त शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे. चार वर्षाच्या माहिकाने कुटुंबियांकडे हट्ट केला आणि छत्रपती शिवरायांची मूर्ती घरी आणून त्या मूर्तीवर पुष्पाभिषेक केला.

करिश्मा आणि तिचे पती स्वप्निल माने यांची ही गुणी गोंडस अशी चार वर्षांची माहिका. माहिकाला छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल आतापासूनच प्रचंड आदर आणि आकर्षण असल्याचे दिसते. उनाडक्या करायचा वयात महाराजांप्रती असलेली इतकी ओढ आणि प्रेम नक्कीच वाखान्याजोग आहे. माहिका कुटुंबीयांसमवेत कुठेही बाहेर गेली असता तिची नजर शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरच खिळते आणिती आदराने तत्यांना नमस्कार करते असे तिचे कुटुंबीय सांगतात.

शिवजयंती निमित्ताने या माहिकाने घरच्यांकडे हट्ट धरून अखेर महाराजांची मूर्ती घरी आणलीच. तिचा बऱ्याच दिवसांपासूनचा हट्ट आज मात्र पुरा झाला. सकाळी सकाळी सजून सवरून माहिका दुकानात गेली आणि महाराजांच्या मूर्तीला सन्मानाने घरी घेऊनच आली. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी हा यावर फेसबुकवर एक लाईव्ह व्हिडिओ केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment