बीड जिल्ह्यात दिवसभरात आढळले ‘इतके’ कोरोना रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी | शेख अनवर

कोरोनावर लस आली जनजागृतीही झाली मात्र कोरोनाच्या आकडेवाढीत रोजच चढ-उतार पाहायला मिळतायत. एकूणच कोरोनाच्या नियमांच्या बाबतीत नागरिकांमध्ये उदासीनता पाह्यला मिळत आहे. रूग्णवाढ घटत असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज शुक्रवारी जिल्ह्यातील 421 संशयितांचे नमुने तपासणीसाठी अंबाजोगाईत पाठविण्यात आले होते. यात 30 जण बाधित सापडले असून 391 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बीड- 9, अंबाजोगाई- 9, आष्टी- 4, धारूर, गेवराई, केज येथे प्रत्येकी २ कोरोना रुग्ण आढळले आहेत माजलगाव, शिरूर येथे प्रत्येकी १ कोरोना रुग्ण आढळला आहे. रुग्णसंख्येत दिलासादायक घट पडत असली तरी निष्काळजीपणा नको असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment