ओट्यावरून पडल्याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; सातारा परिसरातील घटनेने हळहळ

0
38
child death
child death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  घरासमोर खेळताना ओट्यावरून खाली पडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सातारा परिसरातील मोहननगर भागात घडली. चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोमल ज्ञानेश्वर आडागळे वय-4 वर्षे, (रा. मोहननगर, सातारा परिसर,औरंगाबाद) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर आडागळे हे मोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करतात. पती-पत्नी, मुलगी असे तिघे मोहननगर येथे किरायाच्या खोलीत ते राहतात. नित्याप्रमाणे शनिवारी सकाळी कोमल घरासमोरील ओट्यावर खेळत होती.आणि आई घरकामात व्यस्त होती. दरम्यान घरासमोरील आठफूट उंच ओट्यावरून कोमल खाली पडली. या अपघातात कोमलच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती.

तिला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here