इस्लामाबाद। बिघडती परिस्थिती पाहता फ्रान्सने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर पाकिस्तान सोडण्याचा सल्ला दिला आहे. इस्लामाबादमधील फ्रेंच राजदूताने ईमेलमध्ये अशी माहिती दिली आहे की, पाकिस्तानमधील फ्रेंच नागरिकांना गंभीर धोका आहे. जर फ्रेंच नागरिक पाकिस्तानच्या कोणत्याही भागात राहत असेल तर त्याने त्वरित दुसर्या देशात जावे. अथवा फ्रान्समध्ये परत यावे.
पाकिस्तानच्या बर्याच शहरांमध्ये कट्टर इस्लामिक संघटना फ्रान्सशी राजनैतिक संबंध तोडण्याच्या मागणीविरोधात आंदोलन करीत आहेत. तेहरीक-ए-लब्बक पाकिस्तानचे नेते साद रिझवी यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्यांच्या पक्षाने देशव्यापी निषेध सुरू केला. त्या नंतर देशात हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे.
पैगंबर मुहम्मद यांची छायाचित्रे काढण्याच्या मुद्यावरून फ्रेंच राजदूताला देशातून हटवले नाही तर निषेध आंदोलन करण्यात येईल अशी धमकी रिझवी यांनी रविवारी सरकारला दिली होती. कायदा व सुव्यवस्था राखन्यासाठी रिझवीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. रिझवी म्हणाले की, सरकारने फ्रान्समध्ये पैगंबरांची छायाचित्रे प्रकाशित करण्याच्या मुद्दय़ावरून 20 एप्रिलपूर्वी फ्रेंच राजदूताला देशातून हद्दपार केले जाईल असे वचन दिले होते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group