केवायसी अपडेटचे आमिष दाखवून सव्वा लाखाची फसवणूक

0
59
Cyber Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : केवायसी अपडेटचे आमिष दाखवून सव्वा लाखाची फसवणूक केल्याची घटना 15 जूनला रात्री 8 ते 9 च्या सुमारास घडली आहे. बीएसएनएल कंपनीतील निवृत्त टेलिकॉम टेक्निकल असिस्टंटला भामट्याने तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे म्हणत फसवले आहे.

रमेश रामराव देशमुख (वय 67) शिवाजीनगर गारखेडा परिसर असे फसवणूक झालेल्या निवृत्त व्यक्तीचे नाव आहे. बीएसएनएल कंपनीत टेलिकॉम टेक्निकल असिस्टंट म्हणून रमेश देशमुख हे 2014 मध्ये निवृत्त झाले होते. त्यांचे गजानन मंदिर रस्त्यावरील एसबीआय बँकेत पेंशन खाते आहे. 15 जून रोजी रात्री 8 ते 9 या वेळेत देशमुख यांच्या मोबाईलवर त्या भामट्याने संपर्क साधला. त्यावेळी त्याने बीएसएनएल कस्टमर केअर सेंटर मधून अधिकारी बोलतोय तुमचे केवायसी अपडेट करायची आहे. त्यासाठी तुमच्या बॅंकेचे डिटेल्स द्या सांगत भामट्याने प्ले स्टोर मध्ये जाऊन अक्सेस नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. त्यानंतर भामट्याच्या सांगण्यावरून एक्सेस हे अँप डाऊन केल्यानंतर या अँपवर दहा रुपये जमा पाठवले त्यानंतर लगेच पैसे कपात झाल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच देशमुख यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुख यांनी बँक खाते तपासले असता एन-4 येथील एसबीआय बँकेच्या खात्यातून तीन टप्प्यात पन्नास हजार रुपये कपात झाल्याचे दिसून आले. तसेच रामदास टावर येथील एसबीआयच्या खात्यातून आठ टप्प्यात 51 हजार 1760 रुपये, बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून 19 हजार 852 रूपये, 23 हजार 401 रुपये देशमुख यांच्याच एसबीआयच्या हातावर ट्रान्सफर करून त्यातून काढून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here