रिचार्ज न करता पहा TV; सरकारने आणली Free Dish सर्व्हिस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीव्ही (TV) हे आजकालचे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन आहे. परंतु टीव्ही बघण्यासाठी आपल्याला दर महिन्याला रिचार्ज करावा लागतो. अनेकदा सर्वसामान्यांना हा रिचार्ज परवडत नाही. मात्र आता यावर उपाय म्हणून सरकारने एक नवीन योजना आणली आहे. सरकारकडून Free Dish Connection हा पर्याय दिला जात आहे. ज्याच्या मदतीने, तुम्ही डिश घरबसल्या सहजपणे इन्स्टॉल करू शकता आणि यूजर्सना टीव्ही पाहण्यासाठी कोणत्याही रिचार्जची आवश्यकता नाही.

डीडीकडून फ्री डिश DTH सेवेचा पर्याय दिला जात आहे. हे सार्वजनिक सेवा प्रसारक प्रसार भारती द्वारे प्रदान केले जात असून 2004 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेतल्यानंतर, तुम्हाला फ्री-टू-एअर (FTA) डायरेक्ट-टू-होम (DTH) दिले जाते. याचा अर्थ तुम्हाला दर महिन्याला रिचार्जकरण्याची आवश्यकता नाही. एकदा गुंतवणूक करून तुम्ही ते सहज इन्स्टॉल करू शकता. ही सेवा घेण्यासाठी तुम्हाला एकदाच 2 हजार रुपये खर्च करावे लागतील. यानंतर कोणताही रिचार्ज करण्याची गरज नाही. म्हणजेच तुम्हाला कायमस्वरूपी मोफत टीव्ही चॅनेल बघायला मिळतील.

कसा अर्ज कराल?

तुम्हाला या फ्री मधील डिश सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 1800114554 आणि 011-25806200..या दोन्ही नंबर वर संपर्क करावा लागेल. तुमच्या जवळचा जो कोणी केबल ऑपरेटर असेल त्याच्याकडून सुद्धा तुम्ही हि मोफत मिळणारी डिश घेऊ शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे टीव्ही असणे अनिवार्य असून त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. एकदा हि डिश बसवली कि मग तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची काळजी करण्याची गरज नाही. मात्र त्यात फक्त निवडक चॅनेल दिसतील. अजून कोणते चॅनेल पाहायचे असतील तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील.