ट्रेनमधील जागेवरून महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, Video आला समोर

Free Style Fight
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यातील टिटवाळा येथे एका महिलेला मारहाण (Free Style Fight) झाल्याची घटना ताजी असताना ठाण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल सायंकाळी घडली आहे. या घटनेत काही महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Free Style Fight) झाल्याचे पाहायला मिळत आहे. या हाणामारीचा (Free Style Fight) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
बुधवारी संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान ठाणे ते पनवेल या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हि हाणामारी (Free Style Fight) झाली. लोकलमधील बसण्याच्या आसनवरून तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Free Style Fight) झाली. ठाण्यावरून बसलेल्या मायलेकी आणि नात या पनवेलचे दिशेने जात होत्या. यावेळी कोपरखैरणे येथे महिला चढली. यानंतर तुर्भेत जागा झाली. यामुळे ती बसली असता छोट्या मुलीला बसू दिलं नाही, यावरून या महिलांमध्ये बाचाबाची झाली.

यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर पुढे मारामारीत (Free Style Fight) झाले. हे भांडण सोडवण्यासाठी नेरूळ वरून महिला पोलीस कर्मचारी या ट्रेनमध्ये चढल्या असता त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली. या हाणामारी (Free Style Fight) प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ठाण्यावरून चढलेल्या माय लेकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!