सिंधुदुर्ग | किल्ले सिंधुदुर्ग इथं महिला पर्यटकांची दादागिरी पाहायला मिळाली. केवळ 5 रुपये कर भरण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. साताऱ्यातील 40 महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यावेळी काही महिलांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करत धक्काबुक्की केली. यावेळी स्थानिक महिलांनी पर्यटनाला आलेल्या महिलांना चांगलाच चोप दिला. वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माध्यमातून पर्यटन कर वसुली घेण्याच्या विषयावरुन हा वाद भडकला आणि महिला एकमेकींना भिडल्यात.
सातारा जिल्ह्यातील महिला पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्या आहेत. यानिमित्ताने किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी गेलेल्या होत्या. पर्यंटक महिलांनी आम्ही हा कर भरणार नाही, असे सांगत दादागिरी केली. त्यावेळी काही महिलांनी हुज्जत घातली. हा वाद टोकाला पोहोचला. यावेळी काही महिलांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करत धक्काबुक्की केली. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
साताऱ्याच्या महिलांनी स्थानिक कर्मचारी महिलांना मारहाण केल्याची बातमी समजताच या महिला समर्थकांनी किल्ल्यावर धाव घेतली आणि साताऱ्यातील पर्यटक महिलांना चांगलाच चोप दिला. अखेर हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी साताऱ्यातील महिलांनी मारहाण केलेल्या महिला कर्मचाऱ्यांची माफी मागितली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.