पुण्यात 2 गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, धक्कादायक Video आला समोर

Fight Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी (Fight Video) झाली आहे. यामध्ये काही लोक हातामध्ये काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला (Fight Video) करत आहेत. घटनास्थळी काही महिलाही उपस्थित असून त्या ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ही घटना पुण्यातील येरवडा येथील शिवराज चौक परिसरात घडली आहे.

भर रस्त्यावर तुफान हाणामारीचा (Fight Video) हा प्रकार घडला असून घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.या हाणामारी प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. जागेच्या वादातून ही संपूर्ण घटना घडली आहे.

यामध्ये हाणामारी (Fight Video) करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे समजत आहे. येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांकडून हाणामारीचा प्रकार सुरु असल्याने पोलिसांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचे दिसून येत आहे. या हाणामारीमुळे (Fight Video) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. येरवडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करावं, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!