औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने 21 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रविवारी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल वामन बामणे (२५, ह. मु. बीकेसी बांद्रा, कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा ईस्ट, कलानगर, मुंबई, मुळ रा. गोपालवाडी, कांचनवाडी) असे बलात्कार केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी हा तरुणीवर 1 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत अत्याचार करत होता असे तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याने तरुणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच वारंवार शारिरीक संबंध ठेवून अनेकदा गरोदर राहिलेल्या पिडीतेचा गोळ्या खाऊ घालून गर्भपात केला.
या सर्व प्रकारानंतर आरोपीने पिडीते सोबत लग्न न करता दुस-या तरुणीसोबत संसार थाटून थाटला. आणि फसवणूक केली. त्यांनतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावरुन रविवारी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.