भाग भाग भाग, आया शेर आया शेर..! आता मिका सिंग आणि केआरकेमध्ये ट्विटर वॉर सुरु

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या वक्तव्यांमुळे आणि अर्वाच्य समीक्षांमुळे सातत्याने चर्चेत राहणारा, एक एक करत अनेक वाद स्वतःहून हौसेने ओढवून घेणारा बॉलिवूडचा स्वयंघोषित समीक्षक कमाल आर. खान अर्थात केआरके याने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत पंगा घेतला आणि फलस्वरूपी सलमानने त्याच्या विरोधात थेट मानहानी दावाच ठोकला. यानंतर आता या वादात बॉलिवूडचा शेर अर्थात गायक मिका सिंगची एन्ट्री झाली आहे. त्याने केआरकेला असे काही फटकारले आहे कि बस रे बस्स.. यानंतर केआरकेने आपले अकाउंट लॉक केले आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही कि, केआरकेची ची हालत ‘भाग भाग, शेर आया’, अशी झाली आहे.

सोशल मीडियावर एक चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना मिकाने केआरकेला सरळ आव्हान देऊ केले आहे. ‘हा (केआरके) फक्त बॉलिवूडच्या सभ्य, लोकप्रिय लोकांशी पंगा घेतो, बाप लोकांशी नाही. मी करण जोहर वा अनुराग कश्यप नाही, मी याचा बाप आहे,’ असे मिकाने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

शनिवारी एका मुलाखतीदरम्यान मिका केआरकेवर कडकडून बरसला होता. सलमान खानने केआरकेवर मानहानीचा दावा ठोकून एकदम बरोबर केले आहे. त्याने मला डिवचून बघावे. माझ्याकडून केस वगैरे होणार नाही. थेट थप्पड पडेल. केआरके इतका मोठा उंदीर आहे की तो आपल्या बिळाबाहेर निघणार नाही. कारण त्याला माहितीये, बाहेर येताच त्याला थप्पड पडणार आहेत, असे मीका म्हणाला होता.

 

मिकाच्या या मुलाखतीनंतर प्रसिद्ध स्वयंघोषित समीक्षक केआरके याना शांत राहवले नाही. त्याने मिकाला ट्विट करत प्रत्युत्तर दिले होते. ‘आता या प्रकरणात पब्लिसिटी मिळवण्यासाठी एका चिरकुट सिंगरने उडी घेतली आहे. पण मी त्याला ही संधी देणार नाही जितक्या उड्या मारायच्या तितक्या मार. मी तुला अजिबात भाव देणार नाही, कारण तेवढी तुझी लायकीच नाही,’ असे ट्विट केआरकेने केले होते. अर्थात आपल्या ट्विटमध्ये त्याने मिकाचे नाव घेणे टाळले. पण चिरकूट सिंगर कुणाला म्हटले जातेय ते लोकांना कळल्याशिवाय राहिले नाही. मीकाच्या या ट्विटर वॉरमध्ये त्याची मैत्रीण आकांशा पुरी देखील त्याचे समर्थन करताना दिसतेय.

 

केआरकेने सलमानच्या ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची वाट्टेल त्या शब्दात प्रचंड खिल्ली उडवली होती. हा चित्रपट पाहून माझी तब्येतच बिघडली, असे त्याने रिव्ह्यू देताना म्हटले होते. दरम्यान राधे म्हणजे कोरोनाची तिसरी लाट आहे, असेही तो म्हणाला होता. यानंतर ‘राधे’चा खराब रिव्ह्यू दिल्यामुळे सलमानने आपल्यावर मानहानीचा दावा ठोकला, असे त्याने म्हटले होते.

मात्र सलमानच्या वकीलांनी गुरूवारी याबाबत खुलासा केला होता. मानहानीचा दावा व राधेच्या रिव्ह्यू यांचा काहीही संबंध नसून या मानहानी दाव्याचे कारण वेगळे आहे. केआरके सलमानच्या अधिकृत बीइंग ह्युमन ब्रँडला आणि त्याच्या खाजगी आयुष्यातील बाबींविषयी सतत अपमानास्पद बोलून बदनाम करण्याचे प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याच्याविरोधात मानहानी दावा ठोकण्यात आल्याचे वकीलाने स्पष्ट केले होते.