‘ते’ प्रकरण अंगाशी आल्यामुळेचं जलयुक्त शिवार योजनेची चौकशी; चंद्रकांतदादांचा ठाकरे सरकारवर थेट आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर चांगलेच भडकले आहेत. आरेमधील कारशेडचं स्थलांतर सरकारच्या अंगाशी आल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा मुद्दा समोर आणला आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयावर भाजपच्या इतर नेत्यांसह चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.

“आम्ही घेतलेले निर्णय केवळ आकसापोटी रद्द करण्याचा सपाटा या सरकारने सुरु केला आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बिनधास्त करा. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. मात्र ही योजना केवळ सरकारची नसून यामध्ये लोकसहभाग देखील होता हे लक्षात घ्या, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
0.17 टक्के नमुन्यांवरुन संपूर्ण योजनेबाबत तर्क लावणे हे अत्यंत चुकीचे आहे. यामध्ये लोकांनी त्याचबरोबर सामाजिक संस्थांनी देणगी दिली आहे. त्यांची देखील तुम्ही चौकशी करणार का असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

“तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारा या योजनेचा फायदा झाला आहे की नाही. तुम्ही आमीर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे त्यांना विचारा की त्यांनी किती काम केले आहे. त्यामुळे केवळ आकस मनामध्ये धरुन चौकशी करणे हे अत्यंत चुकीचे आहे. आरेमधील कारशेड हलवणे सरकारच्या अंगाशी आलं आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा मुद्दा समोर आणला आहे,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment