उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला. नेहमी लोकांना घरात राहा म्हणून विनंती करणारे, जनतेला वेळ पडली तर त्यांच्या चुकांसाठी खडसावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीपेक्षा आपल्या संवादाची वेगळी सुरुवात केली. यावेळी करोनाच्या लढाईत सर्वात मोठी मदत केलेल्या सोलापूरच्या चिमुकल्या आराध्याचे आभार आणि कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादाची सुरुवात केली.

या आराध्याने राज्यावरील करोनाचं संकटाला पळवून लावण्याच्या लढाईत सहभाग घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. आराध्याच्या या मदतीची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”सगळेजण लॉकडाउनच्या काळात संयम दाखवत आहेत. आराध्याने वेगळा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे. आज तिचा वाढदिवस आहे. तिने वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. सात वर्षांच्या मुलीमध्ये ही समज आली असेल तर आपण हे युद्ध जिंकलंच समजाच.” असं म्हणत आराध्याचे कौतुक केलं. तर अशी ही आराध्या. चला तर पाहूया मदत करताना या आराध्याने नेमकं काय म्हटलं आहे ते….

मुख्यमंत्र्यांनी नावाजलेली आराध्या नक्की कोण? पहा व्हिडिओ

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here