ईडीकडून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर अजितदादांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । सिंचन घोटाळा प्रकरणात एसआयटीने क्लीनचिट दिल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. (Ajit Pawar on investigation of irrigation scam) दरम्यान, या चौकशीवर अजितदादांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही, असं म्हणत अजितदादांनी या विषयावर बोलणं टाळलं.

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. अजित पवार यांनी आज पंढरपुरात जाऊन या भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वेगवेगळ्या एजन्सी चौकशी करत असतात. ते त्यांचं कामच आहे. मागच्या 6-7 वर्षांपासून चौकशी सुरूच आहे. सध्या हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर बोलणं योग्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

जलयुक्तची चौकशी आकसाने नाही
जलयुक्त शिवारची चौकशी करण्यात येत असल्यामुळे सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यात येत आहे का?, असा सवाल पवार यांना विचारण्यात आला. तेव्हा जलयुक्त शिवारावर कॅगने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आला आणि त्यावर चर्चा झाली. त्यात या चौकशीचा निर्णय घेण्यात आला. जलयुक्तच्या चौकशीचा निर्णय केवळ कॅगच्या आधाराने करण्यात येत आहे. कुणाचीही आकसानं चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच कॅग कुणाच्या नियंत्रणाखाली येतो? असा सवालही त्यांनी केला. (Ajit Pawar on investigation of irrigation scam)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment