आमदार रोहित पवारांकडून राजपुत्र अमित ठाकरेंचं कौतुक, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयास मनसेनं पाठिंबा दर्शवला आहे. सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत, ‘मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडेल,’ असं मनसे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमित ठाकरेंचं कौतुक केले आहे. सरकारच्या चांगल्या कामाला दिलसे पाठिंबा देणारे आपल्यासारख्या नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयास विरोधी पक्षानं कडाडून विरोध करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प दुसरीकडे हलविणे किती नुकसानीचे आहे, हे आकडेवारीसहित सांगितले. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला असून राष्ट्रवादीने त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. मेट्रो कारशेड आरेमधून हटविल्यामुळे आर्थिक नुकसान होईल असे आरोप होत आहेत? अमित ठाकरेंना काय वाटतं, या प्रश्नावर अमित ठाकरेंनी उत्तर दिलंय.

मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडेल, असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, अमित ठाकरे हेही पर्यावरणप्रेमी असल्याचं या ट्विटवरुन सांगण्यात आलंय. मनसेच्या या ट्विटचे आणि अमित ठाकरेंच्या भूमिकेचं रोहित पवार यांनी स्वागत केलंय. ”आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टिका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, पण सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला,” असे रोहित यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment