लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सज्जाद चकमकीत ठार; बारामुल्ला हल्ल्याचा जवानांनी घेतला बदला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर सज्जाद इलियास हैदर याचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस व जवानांसाठी हे मोठे यश असल्याचे काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलतांना सांगितले आहे. तसेच, आतापर्यंत या चकमकी दरम्यान २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्वाची बाब म्हणजे भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलेल्या या दहशतवाद्यांमध्ये आज बारामुल्लामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एका दहशतवाद्याचा देखील समावेश असल्याची माहिती आयजी विजय कुमार यांनी दिली आहे. आज सकाळी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) शहीद झाले होते.

बारामुल्लातील क्रिरी भागात हा हल्ला झाला होता. या नंतर हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती व परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा जवानांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान, दुपारी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली व यात आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवर दहशतवाद्यांनी केलेला हा तीन दिवसातील दुसरा हल्ला होता. या अगोदर १४ ऑगस्ट रोजी श्रीनगरमधील नवगाम सेक्टरमध्ये दोन पोलीस दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. तर एकजण जखमी झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment