सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
धावडशी ता. सातारा येथील शेतकरी शालीवान जयसिंग पवार (वय 33) याचा कळंबे येथील शिवारात गुरुवारी रात्री 11.45 च्या सुमारास मित्रानेच डोक्यात टिकाऊ घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शालिवान पवार हा कळंबे येथील शिवारात आपल्या मित्राबरोबर शेताच्या बांधावर चेंबर काढण्यासाठी टिकावाच्या साह्याने खड्डा खोदत होता. शालीवान याच्या समवेत असलेला त्याचा मित्र अनिल तुकाराम पवार रा. मकनपुर लमाण तांडा,कर्नाटक (सध्या राहणार नेले ता. सातारा) याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता.
भांडणाच्या रागाने अनिल याने शालिवानच्य हातातील टिकावाने शालीवान च्या डोक्यात, मानेवर व पाठीवर गंभीर जखम करून त्याचा खून केला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शालीवान पवार हे शेतीबरोबर मजुरी करत होते. रात्री 10 च्या सुमारास ते कळंब येथील शेतात मजुरी करण्यात गेले होते. रात्री शालिवान हा डोक्यास मार लागून शेतामध्ये पडला होता. तेथील शेतकऱ्यांना ही घटना कळताच त्यांनी फोनवरून पवार यांच्या नातेवाईकास कळवली.
शेतामधे शालीवान हा जख्मी अवस्थित रक्तचया थारोळ्यात पडलेला दिसला. ही खबर पोलीस पाटील यांनी रात्रीच पोलिसांना दिली. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करून संबंधितावर गुन्हा नोंद केला. शुक्रवारी सकाळी संबंधित आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मिथुन मोरे करत आहेत.