घाबरट शिवसैनिकांचा मांजरीला दूध पाजून युवा मोर्चाकडून निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या शिवसैनिक आणि भाजप यांच्यात चांगलाच राडा झाला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. तसेच राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी या गोष्टीचा निषेध म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांनी भाजपच्या कार्यलयासमोर दगडफेक केली आहे.याला भाजपने तोडीस तोड उत्तर दिले आहे.

भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी भाजप पुणे शहर मध्यवर्ती कार्यलायामध्ये कोंबड्या सोडल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप पुणे शहर आणि युवा मोर्चाकडून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे मांजरीला दूध पाजून निषेध नोंदवला आहे. या आंदोलनादरम्यान तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

https://twitter.com/BJYM4Kothrud/status/1430112437940809735

रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली आहे. त्यानंतर आता नाशिक पोलिसांकडे नारायण राणे यांचा ताबा देण्यात येणार आहे. नारायण राणेंना घेऊन पोलिसांचं पथक रत्नागिरीकडे रवाना झालं आहे.