नवी दिल्ली । नवीन वर्ष 2022 च्या आगमनाची उलटी गणती सुरू झाली आहे. सर्वसामान्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत नववर्षाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. नवीन वर्षाची नवी सुरुवात कशी असेल याचे प्लॅन्स काही जण तयार करत आहेत. मात्र प्रत्यक्षात 1 जानेवारीपासून असे अनेक नियम बदलत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
काही बँकांच्या कामकाजातही बदल होणार आहे. उदाहरणार्थ, तुमचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मध्ये असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची आहे, कारण 1 जानेवारीपासून तुम्हाला IPPB मध्ये 10,000 रुपये डिपॉझिट्स करण्यासाठी आणि काढण्यासाठी वेगळे शुल्क भरावे लागेल.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ग्राहकांना 3 प्रकारची बचत खाते सर्व्हिस देते. या बचत खात्यांचे स्वतःचे नियम आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, तुम्ही सर्व पेमेंट बँक खात्यांमध्ये 1 लाख रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट्स ठेवू शकत नाही, मात्र तुम्ही पोस्ट ऑफिस बँकेत खाते उघडू शकता जिथे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते.
IPPB बेसिक सेव्हिंग अकाउंट
मूलभूत बचत खात्यात कोणत्याही रकमेपर्यंत कॅश डिपॉझिट फ्री असेल. दर महिन्याला 4 पैसे काढण्याचे ट्रान्सझॅक्शन फ्री असतील. त्यानंतर पैसे काढण्याचे शुल्क मूल्याच्या 0.50 टक्के असेल आणि किमान 25 रुपये प्रति ट्रान्सझॅक्शन असेल.
IPPB सेव्हिंग आणि करंट अकाउंट
भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये 10,000 रुपयांपर्यंतची कॅश डिपॉझिट फ्री असेल. 10,000 नंतर 0.50 टक्के शुल्क आकारले जाईल. जे प्रति ट्रान्सझॅक्शन किमान 25 रुपये असेल.
सेव्हिंग आणि करंट अकाउंटमधून 25,000 रुपयांपर्यंत कॅश काढणे दरमहा फ्री असेल आणि त्यानंतर प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर अर्धा टक्के शुल्क आकारले जाईल.
IPPB वेबसाइटनुसार, “सर्व संबंधितांना कळवण्यात येत आहे की, कॅश डिपॉझिट आणि कॅश पैसे काढण्याचे ट्रान्सझॅक्शन 01 जानेवारी 2022 पासून लागू होतील. या किमती जीएसटी/सेस व्यतिरिक्त लागू असलेल्या दरांवर लागू होतील.” याआधी, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने 01 ऑगस्ट 2021 पासून आपले डोअरस्टेप बँकिंग चार्ज बदलले होते, जे प्रति ट्रान्सझॅक्शन 20 रुपये होते.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 1 सप्टेंबर 2018 रोजी देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केली. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही भारत सरकारच्या पोस्ट विभाग आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, ज्यामध्ये तिचा 100% हिस्सा आहे. खेड्यापाड्यातून बँकिंगचा प्रसार करण्यासाठी, भारतीय पोस्टल सेवेच्या माध्यमातून एक नवीन बँकिंग सिस्टीम सुरू करण्यात आली जी ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक’ म्हणून ओळखली जाते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून, भारत सरकार देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बँकिंग सुविधा देण्यास सक्षम असेल तसेच शेतकरी आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत करेल.