मोबाईलधारकांनो ऐका!! ‘या’ तारखेपासून सिमकार्डसंदर्भात नवीन नियम लागू होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 1 जुलै 2024 पासून संपूर्ण देशभरात सिमकार्डसंदर्भात नवीन नियम (Sim Card New Rules) लागू होणार आहेत. या नवीन नियमांमुळे ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या टोळ्यांवर आळा बसणार आहे. हे नवे नियम टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया मोबाईलच्या सिमकार्ड संदर्भात लागू असतील. परंतु या नियमांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल. कारण, नुकतेच मोबाईल धारकांनी आपले सिमकार्ड स्वॅप केले असेल तर त्यांना आपला मोबाईल क्रमांक पोर्ट करता येणार नाही.

सध्या पाहिला गेलो तर, गैरपद्धतीने बाजारात सिम कार्ड विक्रीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकजण वेगवेगळ्या नावाने सिम कार्ड घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. त्यामुळेच या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी 1 जुलैपासून सिमकार्ड संदर्भात नवीन जारी होणार आहेत. या नवीन नियमामुळे तुम्ही जर तुमच्या सिमकार्डला स्वॅप केले असेल तर तुम्हाला आपला मोबाईल क्रमांक पोर्ट करता येणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो की, सिम कार्ड आदलाबदली करण्याला सिम स्वॅप असे म्हटले जाते.

थोडक्यात तुमचे सिमकार्ड खराब झाले असेल किंवा तुटले असेल तर तुम्हाला ते स्वॅप करून मिळते. परंतु या नवीन नियमामुळे तुम्ही सिमकार्ड स्वॅप केले असेल तर तुम्हाला त्या सिमकार्डचा असलेला नंबर पोर्ट करता येणार नाही. हे सर्व नियम केवळ सिमकार्डसंदर्भात होणारे घोटाळे रोखण्यासाठी लागू करण्यात येणार आहेत.

दरम्यान, वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर सिम स्वॅपिंगचे घोटाळे ही वाढले आहेत. अनेकजण मोबाईल हरवला आहे असे कारण देत नवीन सिमकार्ड खरेदी करतात. या सिमकार्ड वरूनच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला धमकी देणे, फसवणे असे प्रयोग केले जातात. अनेकवेळा तर चुकीच्या नंबरवरून पैशांची मागणी ही करण्यात येते. त्यामुळेच अशा सर्व घटनांना आळा बसवण्यासाठी सिमकार्ड खरेदीचे नियम ते सिमकार्ड वापरण्याचे नियम कठोर करण्यात आले आहेत