पुण्याची सायकलपटू प्रीती मस्केची गिनीज बुकमध्ये नोंद ! लेह ते मनाली, 55 तास सायकल चालवणारी ठरली पहिली महिला

Preeti Maske
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनाली : वृत्तसंस्था – पुण्याची सायकलपटू प्रीती मस्के (Preeti Maske) यांनी शुक्रवारी 55 तास 13 मिनिटांत लेह ते मनाली असा सायकल प्रवास करून विक्रम केला आहे. असा विक्रम करणारी ती पहिला ठरली आहे. याची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. प्रीती मस्के (Preeti Maske) यांचे वय 45 असून त्या दोन मुले आहेत. तज्ञांनी सांगितले की, 430 कि.मी. चा मार्ग आणि त्याला 8,000 मीटर उंची असा हा टास्क खूपच कठीण होता. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने तिला 60 तासांची विंडो दिली होती. प्रीतीच्या (Preeti Maske) या प्रवासाला लेह येथून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने 22 जून रोजी सकाळी 6 वाजता लेह येथील मुख्य अभियंता ब्रिगेडिअर गौरव कार्की यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला. मनाली येथे काल दुपारी 1.13 वाजता बीआरओचे कमांडर कर्नल शबरीश वाचली यांच्या उपस्थितीत प्रीती मस्के यांनी हा प्रवास पूर्ण केला.

झोपेचे व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान
“या अतिउंचीवरील सायकलिंग मोहिमेत प्रीतीला न झोपता प्रवास करायचा होता त्यामुळे झोपेचे व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान होते. हाय पासवर श्वास कोंडल्यामुळे तिने या मार्गावर दोनदा ऑक्सिजन घेतला.”अशी माहिती प्रीतीचे (Preeti Maske) क्रू मेंबर आनंद कंसल यांनी दिली. तसेच ते म्हणाले “प्रीतीसाठी ही एक आव्हानात्मक मोहीम होती, जी बीआरओच्या पाठिंब्याशिवाय शक्यच नव्हती. बीआरओने दोन वाहनांसह सॅटेलाइट फोन, वैद्यकीय सहाय्यक तैनात केली होती.

प्रवासाच्या 10 दिवस आधी लेहला भेट दिली
प्रीती मस्केने (Preeti Maske) तिच्या प्रवासाच्या सुमारे 10 दिवस आधी लेहला भेट दिली होती. ही भेट देण्याचे कारण म्हणजे तिला या हवामानाची सवय आहे याची खात्री करून घेणे होते. प्रीती मस्के यांचे वय बघता सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत. प्रीती मस्के यांचे वय 45 असून त्या दोन मुले आहेत. त्यांचा हा प्रवास नक्कीच सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे.

हे पण वाचा :
मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं; शंभुराज देसाईंच्या पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंटचा पाऊस

जितेंद्र आव्हाडांच स्वप्न होणार साकार; ‘शाहू छत्रपती’ चित्रपटाची दमदार घोषणा

च्यायला ! मी कधी जातीयवादी पोस्ट केली..?; नेटकऱ्याच्या मॅसेजवर किरण माने वैतागले

ऊसाची उंची जाडी वाढावी यासाठी काय करावे?

उदय सामंत गुवाहाटीला रवाना; शिवसेनेला मोठा धक्का