नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घोषित केल्यानुसार येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे. तुम्हालाही लसीकरण करायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लसीकरण करणाऱ्यांसाठी येत्या शनिवारपासून कोविन ॲप(CoWin app)वर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. सध्या देशात 45 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे.
48 तासांमध्ये सुरु होणार रजिस्ट्रेशन
याबाबत बोलताना नॅशनल हेल्थ अथॉरिटी चे सीईओ शर्मा गुरुवारी म्हणाले की,’ 18 वर्षांवरील सर्वांसाठी व्हॅक्सिनेशन रजिस्ट्रेशन 48 तासांमध्ये सुरू होईल. कॅव्हिडशील्ड आणि कोवॅक्सीन शिवाय काही लसीकरण केंद्रांवर रशियन लस स्पुटॅनिक V याचा पर्यायही उपलब्ध असेल. लसीकरण वेगाने व्हावे यासाठी अधिक केंद्र स्थापित केली जाणार आहेत. शर्मा यांनी सांगितले की खासगी कंपन्यांनाही कोविन अँप वर लसीकरणाचे वेळापत्रक प्रकाशित करण्याबाबत सांगितले आहे.
दरम्यान देशामध्ये लसीकरण मोहीम आता तीव्र करण्यात येणार आहे गुरुवारच्या दहाव्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 13 कोटी 23 लाख 30 हजार 644 लसीचे डोस देण्यात आलेले आहेत. तर मागील 24 तासात 22 लाख 11 हजार 334 जणांना लस देण्यात आली आहे.देशातील तरुणांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. एका दिवसात देशात तब्बल तीनदा 14 हजार 835 नवे करुणा बाधित रुग्ण आढळलेले आहेत. आतापर्यंत जी रुग्ण वाडीची ही रेकॉर्डब्रेक संख्या आहे. तर मागील 24 तासात 2,104 जणांना करून आम्हाला आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.