यापुढे मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार – खा. इम्तियाज जलील

0
59
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा आपला हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे शहराला व जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता. असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 15 ऑगस्ट रोजी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार अशी माहिती इमतियाज जलील यांनी दिली.

आज शहरातील सुभेदारी हाऊस येथे इम्तियाज जलील यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याच्या निषेधार्थ येत्या 15 ऑगस्टला एमआयएम पक्षाच्या वतीने सर्व राज्याच्या नेत्यांना व मंत्र्यांना घेराव घालून व काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत.

क्रीडा विद्यापीठ वापास आणण्यासाठी आंदोलन असेच पुढे चालू ठेवणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. औरंगाबादेत होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला होणार असल्याने औरंगाबादेतील नागरिकांसह काही पक्षांनी या गोष्टीचा विरोध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here