Fruits And Vegetables | महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला आता गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसत आहे. याबाबतची माहिती गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री रवींद्र नाईक यांनी दिलेली आहे. यावेळी गोव्याचे फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष यांनी फळ आणि भाजीपाला (Fruits And Vegetables) सप्लाय करण्याबाबत देखील सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
नागरिकांना फळे आणि भाजीपाला (Fruits And Vegetables) पुरवण्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. आणि याच अडचणींबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आलेली आहे. या बैठकीत पहिल्या टप्प्यात फळे पुरवठा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. गोवा सरकाराचा दीड हजार आउटलेटच्या माध्यमातून ग्राहकांना भाजीपाला आणि फळे देण्याचा उपक्रम सुरू करणार आहे. हा उपक्रम आता गोवा राज्यातच राबवला जाणार आहे.
या बैठकीमध्ये अनेक लोक उपस्थित होते. गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कृषी भूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखाली ही चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये कोल्हापूर शेतकरी शिष्टमंडळाने देखील भाजीपाला आणि फळे सप्लाय करण्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. यावेळी त्यांनी गोव्यातील फळे आणि भाजीपाला 20 विक्री केंद्रांना भेट दिलेली आहे आणि सविस्तर माहिती देखील घेतलेली आहे.
गोव्यामध्ये जे फळे आणि भाजीपाला (Fruits And Vegetables) विक्री केंद्र सुरू केलेले आहेत. हे केंद्र आपल्या देशासाठी एक आदर्श विक्री मॉडेल ठरणार आहे याबाबतची माहिती कृषी भूषण अंकुश पडवळे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार आहे. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा हा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे आता गोवा सरकारला देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या गरजेनुसार फळे आणि भाजीपाला विकत घेता येणार आहे. शिष्टमंडळाच्या बैठकीत हा एक मोठा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. अनेक लोक या बैठकीत सामील होते. आणि सगळ्यांच्या उपस्थिती हा निर्णय घेण्यात आलेला आहे.